Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

marathi vakprachar | मराठी वाक्यप्रचार व अर्थ 2

 वाक्प्रचार म्हणजे काय? शब्दसमूहांचा मराठी भाषेत वाक्यात वापर करताना त्यांच्या नेहमीच्या अर्थापेक्षा वेगळ्या व विशिष्ट अर्थाने भाषेत रूढ झालेल्या शब्द समूहास वाक्प्रचार अथवा भाषेतील संप्रदाय असे म्हणतात. अशी वाक्यप्रचारपाची व्याख्या आपणास करता येते. वाक्प्रचार हा शब्द किंवा वाक्प्रचार अशा अभिव्यक्तीला सूचित करतो ज्याचा अर्थ ते बनवणाऱ्या शब्दांच्या अर्थावरून काढता येत नाही .भाषेचे सौदर्य वाढवण्यासाठी म्हणी वाक्यप्रचार खूप महत्वाचे असतात. याचा लेखनात व वाचनात वापर केल्यामुळे आपली भाषा अधिक प्रभावी बनत असते. म्हणून आपणास वाक्यप्रचार माहिती असणे गरजेचे असते. होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला वाक्यप्रचार असे म्हणतात .

मराठी वाक्यप्रचार व अर्थ 

सराव प्रश्नपत्रिका 2

marathi vakprachar | मराठी वाक्यप्रचार व अर्थ 2




1/25
'तोंड टाकणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ निवडा ?
नवल करणे
निधन होणे
अव्दातव्दा बोलणे
परतफेड करणे
Explanation: अव्दातव्दा बोलणे
2/25
'हात पाय हलविणे' या वाक्यप्रचाराचा नेमका अर्थ काय ?
व्यायाम करणे
पोहणे
प्रयत्न करणे
पळून जाणे
Explanation: प्रयत्न करणे
3/25
खालील दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्यायी शब्दांतून शोधा 'अंग चोरणे'
चोरी करणे
नाचणे
रागाने बेफाम होणे
कामात कुचराई करणे
Explanation: कामात कुचराई करणे
4/25
'उंबराचे फुल' या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे?
कंटावळवाणी गोष्ट
क्वचित भेटणारी व्यक्ती
अतिशय प्रिय वस्तू
संकटाची चाहूल
Explanation: क्वचित भेटणारी व्यक्ती
5/25
चुकीचा अर्थ असलेला वाक्यप्रचार ओळखा.
जोडे फाटणे - खूप हेलपाटे घालणे २) ३) ) चलबिचल होणे - अस्वस्थ होणे
गळ घालणे - आमिष दाखवणे
दाती तृण धरणे - शरणागती पत्करणे ४
चलबिचल होणे - अस्वस्थ होणे
Explanation: गळ घालणे - आमिष दाखवणे
6/25
. 'वैधव्य येणे' विसंगत पर्याय सांगा.
बांगडी फुटणे
कुंकू पुसणे
गंगाभागीरथी होणे
बांगड्या भरणे
Explanation: बांगड्या भरणे
7/25
वाक्यप्रचाराचा योग्य अर्थाचा पर्याय ओळखा: साखर पेरणे
मुंग्यांना साखर घालणे
उसाची शेती करणे
गोड बोलणे
गुंगून जाणे
Explanation: गोड बोलणे
8/25
"माती पेटून उठणे" या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
पर्वा न करणे
आदर दाखविणे
मनात जागृती निर्माण होणे
दुष्काळ पडणे
Explanation: मनात जागृती निर्माण होणे
9/25
"घाट्या मारणे" या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
शस्त्र उपसणे
फसविणे
साचलेल्या कामाचे ढिगारे उपसणे
यापैकी नाही
Explanation: यापैकी नाही
10/25
"खलबत करणे" या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
) कष्ट करणे
वाईट काम करणे
फसविणे
चर्चा करणे
Explanation: चर्चा करणे
11/25
"नाकीनऊ येणे" या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.
नवाचा पाढा पाठ असणे
नबाचा पाढा पाठ नसणे
नाकाचा शेंडा लाल होणे
बेजार होणे
Explanation: बेजार होणे
12/25
. 'नाश होणे' या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा
रसातळाला जाणे
पारा चढणे
पिट्टा पडणे
डोळे उघडणे
Explanation: रसातळाला जाणे
13/25
चौदावे रत्न दाखवणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
खूप श्रीमंत होणे
चौदा रत्ने दुसऱ्यास दाखवणे
खूप रत्ने सापडणे
खूप मार देणे
Explanation: खूप मार देणे
14/25
'घागरगडचा सुभेदार' या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता?
ठणठणपाळ
अकलेचा खंदक
पाणक्या
सैन्यदलातील पदवी
Explanation: पाणक्या
15/25
'हळद लागणे' या वाक्प्रचाराचा अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता ?
कावीळ होणे
विवाह होणे
फसवणूक होणे
साध्य करणे
Explanation: विवाह होणे
16/25
'डाळ शिजणे' या वाक्प्रचाराचा अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता ?
काम न होणे
दाद लागणे
विजयी होणे
थक्क होणे
Option
Explanation: दाद लागणे
17/25
. 'पाणी पडणे', या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता ?
पराभव करणे
पाऊस पडणे
आशा सोडणे
केलेले प्रयत्न व्यर्थ जाणे
Explanation: केलेले प्रयत्न व्यर्थ जाणे
18/25
'मुद्दाम दुर्लक्ष करणे' या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.
औषधाला नसणे
हातावेगळे करणे
काणाडोळा करणे
गाशा गुंडाळणे
Explanation: काणाडोळा करणे
19/25
'भाऊबंदकी असणे' या शब्दाचा अर्थ----
भाऊ-भाऊ
नात्यानात्यात भांडण असणे
भाऊ-बहीण
भावांमधील सलोख्याचे संबंध
Explanation: नात्यानात्यात भांडण असणे
20/25
पुढीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ बरोबर नाही?
त्राटिका-कजाग बायको
डोळे उघडणे-पश्चाताप होणे
खडे फोडणे - दगड फोडणे
जिवापाड जपणे-मायेने सांभाळणे
Explanation: खडे फोडणे - दगड फोडणे
21/25
'कंबर कसणे' या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?
नवल करणे
फार जवळ येणे
हिंमत बांधून भरपूर कष्ट घेणे
अद्वातद्वा बोलणे
Explanation: हिंमत बांधून भरपूर कष्ट घेणे
22/25
धूळभेट या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता ?
खूप वादळ असताना झालेली भेट
पुर्ण पराभव होणे
उभ्या उभ्या झालेली भेट
धुळीमध्ये झालेली भेट
Explanation: उभ्या उभ्या झालेली भेट
23/25
'कपिलाषष्ठीचा योग येणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.
अत्यंत उत्सुक असणे
जबाबदारी स्वीकारणे
दुर्मिळ संधी मिळणे
माघार घेणे
Explanation: दुर्मिळ संधी मिळणे
24/25
'बार उडवणे' ह्याचा अर्थ काय?
कार्य पूर्ण करणे
फटाक्याचे बार काढणे
फैरी झाडणे
कार्यात फटाके उडवणे
Explanation: कार्य पूर्ण करणे
25/25
'डोळ्यावर कातडे ओढणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
कानाडोळा करणे
डोळ्यात तेल घालणे
डोळे झाकून घेणे
डोळ्यास डोळा लागणे
Explanation: कानाडोळा करणे
Result:

Post a Comment

0 Comments