आजचा परीपाठ दिनांक १९/०६/२०२४
राष्ट्रगीत
राज्यगीत 
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
भिती न आम्हा तझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गजर्तो शिव शंभू राजा
दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीव घेणी
दारीद्र्यांच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥
प्रतिज्ञा


आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य घडविण्यास, तसेच
त्याच्या समस्त नागरिकांना:
सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय,
विचार, अभिव्यक्ति, विश्वास , श्रद्धाव उपासना यांचे स्वातंत्र्य ;
दर्जाची व संधीची समानता; निश्चितपणे
प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता परिवर्धित करनेचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आपल्या या संविधान सभेत आज दिनांक
नोव्हेंबर २६, १९४९ला एतद्द्वारे या संविधानला अंगीकृत,
अधिनियमीत आणि आत्मार्पित करीत आहोत.
प्रार्थना
देवा तुझे किती सुंदर आकाश
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो
सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर पदे त्याचेसुंदर ही झाडे, सुंदर पाखरे
किती गोड बरे गाणे गातीसुंदर वेलींची सुंदर ही फुले
तशी आम्ही मुले देवा तुझीइतुके सुंदर जग तुझे जर
किती तू सुंदर असशील
आजचे पंचाग
मास : ज्येष्ठ, पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : द्विदशी , नक्षत्र : विशाखा,
सूर्योदय : सकाळी ०५.५६
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१7सुविचार
चांगला स्वभाव हा गणितातल्या शुन्यासारखा असतो. ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते
19 जून दिनविशेष
१९९९: मैत्रेयी एक्स्प्रेस या कोलकाता ते ढाका बस सेवेचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी उदघाटन केले.१९८९: ई. एस. वेंकटरामय्या - भारताचे १९ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.१९८१: भारताच्या अँपल उपग्रहाचे प्रक्षेपण.१९७८: ईंग्लंडच्या इयान बोथम याने पाकिस्तान विरुद्ध लॉर्डसवर ८ बळी घेऊन शतक सुधा केले.१९७७: ट्रान्स अलास्कन पाइपलाइन - मधुन आर्क्टिक प्रदेशातुन तेलवाहतुक सुरू झाली.१९६६: शिवसेना - पक्षाची स्थापना.१९६१: कुवेत - देशाला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.१९४९: नासकार - चार्लोट मोटर स्पीडवे येथे पहिल्यांदा नासकारची स्पर्धा आयोजित केली गेली.१९१२: अमेरिका - देशात कामगारांसाठी ८ तासांचा दिवस निश्चित करण्यात आला.१९१०: जागतिक वडील दिन - पहिल्यांदा वॉशिंग्टन, अमेरिका येथे साजरा केला गेला.१८६५: अमेरिका - गॅल्व्हेस्टन येथील गुलामांना मुक्ती. हा दिवस येथपासून जून्टीन्थ या नावाने साजरा केला जातो.१८६२: अमेरिका - देशाने गुलामगिरीची प्रथा बेकायदा जाहीर केली.१६७६: मराठा साम्राज्य - शिवाजी महाराजांनी प्श्चात्त्पादग्ध सरनोबत नेताजी पालकर यांना विधीपूर्वक शुद्ध करून हिंदू धर्मात पुन्हा समाविष्ट केले.जन्मदिवस / जयंती१९७०: राहुल गांधी - भारतीय राजकारणी१९६४: बोरिस जॉन्सन - युनायटेड किंगडमचे ७७वे पंतप्रधान१९६२: आशिष विद्यार्थी - भारतीय अभिनते - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार१९४७: सलमान रश्दी - भारतात जन्मलेले ब्रिटिश-अमेरिकन लेखक - बुकर पुरस्कार१९४७: सलमान रश्दी - एंग्लो-इंडियन लेखक - बुकर पुरस्कार१८७७: पांडुरंग चिमणाजी पाटील - पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य१७६४: जोसेगेर्व्हासियो आर्तिगास - उरुग्वे देशाचे राष्ट्रपितामृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन२०२०: विद्याबेन शाह - भारतीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या२००८: बरुण सेनगुप्ता - बंगाली पत्रकार२०००: माणिक कदम - मराठी- हिंदी रंगभूमी चित्रपट अभिनेत्री१९९८: रमेशमंत्री - प्रवासवर्णनकार, कथाकार आणि विनोदी लेखक१९९६: कमलाबाई पाध्ये - समाजसेविका१९९३: विल्यम गोल्डिंग - इंग्लिश लेखक - नोबेल पारितोषिक१९८१: सुभाष मुखर्जी - इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (IVF) वापरून भारतातील पहिले आणि जगातील दुसरे मूल जन्मवणारे भारतीय शास्त्रज्ञ१९६५: जेम्स कॉलिप - इंसुलिनचे सह्संशोधक१९५६: थॉमस वॉटसन - अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM)चे अध्यक्ष१९४९: सैयद जफरुल हसन - भारतीय तत्त्वज्ञ१९३२: रेव्ह. जस्टिन एडवर्ड - मराठी संतवाङमयाचे अभ्यासक आणि प्रचारक१८७७: डॉ.पांडुरंग चिमाजी पाटील-थोरात - शतायुषी कृषिशास्त्रज्ञबोधकथा
जंगल चा राजाएका अरण्यात एक सिंह राहात होता. त्या अरण्यात तो एकटाच शक्तीशाली असल्यामुळे वाटेल तसा वागत असे व तेच योग्य असे म्हणत असे. एकदा सर्व प्राण्यांना एकत्र बोलावून तो म्हणाला, 'प्रत्येकाने मला आपल्या शक्तीप्रमाणे खाद्य पुरवावं म्हणजे रोज शिकार करण्याचा माझा त्रास वाचेल.' सगळ्यांनी ही गोष्ट मान्य केली. पण हा कर कोणत्या धोरणाने बसवावा याबद्दल निश्चित पद्धति ठरे ना. वाघ उभा राहून म्हणाला, 'मला वाटतं, कोणी किती पाप केलं ते पाहून त्या मानाने त्याच्यावर कराची आकारणी करावी, प्रत्येकाने आपल्या शेजार्यावरील कराची आकारणी करावी म्हणजे फसवेगिरीला जागा राहणार नाही.' त्यावर हत्ती लगेच म्हणाला, 'छे, छे, वाघोबाची ही युक्ती निरुपयोगी आहे. त्यामुळे द्वेष, जुलूम वाढतील. माझ्या मते प्रत्येकाचे सद्गुणावर कर बसवावा व तो ज्याचा त्यानेच द्यावा. अशा योजनेने सरकारी तिजोरीत पुष्कळ भर पडेल.'तात्पर्य
- आपले दुर्गुण असतील तर ते झाकून ठेवायचे व थोड्याशा सद्गुणाचे मोठे प्रदर्शन करायचे असा प्रत्येकाचा स्वभाव असतो.देशभक्ती गीत
हे राष्ट्र देवतांचे
- महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा कोणता ? गडचिरोली
- अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात ? जळगाव
- महाराष्ट्रातील संत्र्याचा जिल्हा कोणता ? नागपूर
- भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात ? मुंबई
- भारताची आर्थिक राजधानी कोणती ? मुंबई
- सात बेटांचे शहर कोणते ? मुंबई
- महाराष्ट्रातील साखरकारखान्यांचा जिल्हा कोणता ? अहमदनगर
- महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा कोणता ? कोल्हापूर
- महाराष्ट्रातील कुस्तीगीरांचा जिल्हा कोणता ? कोल्हापूर
- महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा कोणता ? नांदेड
- मुंबईचा परसबाग कोणत्या शहरास म्हणतात - नाशिक
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचेकर्तव्यदक्ष भूमी सीता-रघुत्तमाची
रमायणे घडावी येथे पराक्रमांची
शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचेयेथे नसो निराशा थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचेयेथेच मेळ झाला सामर्थ्य-संयमाचा
येथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा
हे क्षेत्र पुण्यदायी भगवन् तथागताचेहे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे
सत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचे
येथे शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचेयेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जनशासनातळीचा पायाच ‘सत्य’ आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे– ग.दि.माडगूळकर
सामान्य ज्ञान
पसायदान
मौन
विसर्जन
0 Comments