आजचा परीपाठ दिनांक १८/०६/२०२४
राष्ट्रगीत
राज्यगीत 
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
भिती न आम्हा तझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गजर्तो शिव शंभू राजा
दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीव घेणी
दारीद्र्यांच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥
प्रतिज्ञा
संविधान 
- आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
- सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय,
- विचार, अभिव्यक्ति, विश्वास , श्रद्धा
- व उपासना यांचे स्वातंत्र्य ;
- दर्जाची व संधीची समानता; निश्चितपणे
- प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता परिवर्धित करनेचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
- आपल्या या संविधान सभेत आज दिनांक
- नोव्हेंबर २६, १९४९ला एतद्द्वारे या संविधानला अंगीकृत,
- अधिनियमीत आणि आत्मार्पित करीत आहोत.
प्रार्थना
असो तुला देवा! माझा सदा नमस्कार
- असो तुला देवा! माझा सदा नमस्कारतुझ्या दयादातृत्वाला अंत नाहि पार।। असो....।।तुझ्या कृपेने रे होतिल फुले फत्तराचीतुझ्या कृपेने रे होतिल मोति मृत्तिकेचीतुझ्या कृपेने रे होतिल सर्प रम्य हारअसो तुला देवा! माझा सदा नमस्कार।।तुझ्या कृपेने रे होइल उषा त्या निशेचीतुझ्या कृपेने रे होइल सुधा त्या विषाचीतुझ्या कृपेने रे होइल पंगु सिधुपारअसो तुला देवा! माझा सदा नमस्कार।।तुझ्या कृपासिंधूमधला बिंदु जरि मिळेलतरि प्रभो! शतजन्मांची मत्तृषा शमेलतुझे म्हणुनि आलो राया! बघत बघत दारअसो तुला देवा! माझा सदा नमस्कार।।
कवी - साने गुरुजी
आजचे पंचाग
मास : ज्येष्ठ, पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : एकादशी , नक्षत्र : स्वाती,
सूर्योदय : सकाळी ०५.५६
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१६
सुविचार
माझे ते खरे म्हणण्यापेक्षा, खरे ते माझे म्हणा.
म्हण व अर्थ
अति शहाणा त्याचा बैल रिकामा – जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो , त्याचे मुळीच काम होत नाही
१८ जून दिनविशेष
१५७६ : महाराणा प्रताप व अकबर यांच्यात 'हळदी घाटा' ची सुप्रसिध्द घनघोर लढाई झाली.
१९०८ : फिलीपाइन्स विश्वविद्यालाची स्थापना झाली.
१९४६ : डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले. या घटनेच्या स्मरणार्थ पणजींतील एका रस्त्याला '१८ जून रस्ता' असे नाव देण्यात आले आहे.
१९५६ : रँग्लर र. पु.परांजपे पुणे विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू झाले.
१९८३ : अंतराळवीर सैली राइड या अंतराळात प्रवास करणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला आहेत.
१९८७ : एम. एस. स्वामिनाथन यांना प्रथम जागतिक अन्न पुरस्कार (वल्ड फूड) मिळाला.
२००९ : अमेरिकन अंतराळ संस्था नासाने चंद्रावर पाण्याचा शोध घेण्यासाठी विशेष उपग्रह पाठविला.
२०१३ : भारताच्या उत्तराखंड राज्यात मुसळधार पाउस पडून मंदाकिनी व अलकनंदा नद्यांना महापूर. शेकडो मृत्युमुखी, हजारो बेघर.जन्मदिवस / जयंती
१८१७ : राजपूत नेपाळ शासक तसचं, नेपाळचे पहिले पंतप्रधान व राणा राजवंशाचे संस्थापक जङ्गबहादुर राणा यांचा जन्मदिन.
१८८७ : थोर भारतीय स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी, शिक्षक, राजनीतिज्ञ, तसचं, बिहार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री डॉ. अनुग्रह नारायण सिन्हा यांचा जन्मदिन.
१८९९ : शंकर त्रिंबक तथा 'दादा' धर्माधिकारी - स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक. (मृत्यू : १ डिसेंबर १९८५)
१९११ : कमला सोहोनी पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ. (मृत्यू : ८ सप्टेंबर १९९७)
१९३४ : भारतीय वंशीय संगणक वैज्ञानिक, बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्थान, संगणक विज्ञान विभागाचे माजी प्राध्यापक ई. वी. कृष्णमूर्ती यांचा जन्मदिन.
१९९४ : युवा भारतीयह टेनिसपटू प्रार्थना गुलाबराव ठोंबरे यांचा जन्मदिन.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन
१९०१ : रामचंद्र भिकाजी गुंजीकर - 'मोचनगड' या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक आणि 'विविध ज्ञानविस्तार' मासिकाचे संपादक. (जन्म : १० एप्रिल १८४३)
१९६२ : जे. आर. तथा नानासाहेब घारपुरे - पुण्याच्या विधी महाविद्यालयाचे संस्थापक आणि प्राचार्य, नामवंत विद्वान.१९७४ : सेठ गोविंद दास - स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती, साहित्यिक. (जन्म : १६ आक्टोबर १८९६)१९९९ : श्रीपाद रामकृष्ण काळे - ५२ कादंबऱ्या आणि ११०० हुन अधिक कथा लिहिणारे साहित्यिक, कथा आणि कादंबरीकार.२००३ : जानकीदास - हिन्दी चित्रपटातील चरित्र अभिनेते.२००५ : भारतीय क्रिकेटपटू मुश्ताक अली यांचे निधन. (जन्म : १७ डिसेंबर १९१४)२०२० : लच्छमानसिंग लेहल मेजर जनरल - वीर चक्र, परम विशिष्ठ सेवा. (जन्म : ९ जुलै १९२३)२०२१ : मिल्खा सिंग - द फ्लाइंग शीख, धावपटू - पद्मश्री (जन्म : ८ ऑक्टोबर १९३५)
देशभक्ती गीत
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचेकर्तव्यदक्ष भूमी सीता-रघुत्तमाची
रमायणे घडावी येथे पराक्रमांची
शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचेयेथे नसो निराशा थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचेयेथेच मेळ झाला सामर्थ्य-संयमाचा
येथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा
हे क्षेत्र पुण्यदायी भगवन् तथागताचेहे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे
सत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचे
येथे शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचेयेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जनशासनातळीचा पायाच ‘सत्य’ आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे– ग.दि.माडगूळकर
बोधकथा
राजकुमारएक राजकुमार विवाह करण्याच्या वयात असतो, त्यासाठी स्वतःचे स्वयंवर तो स्वतःच घोषित करतो. राज्यातील इच्छुक तरुणींना दरबारात ठराविक दिवशी हजर राहण्याची दवंडी सर्वत्र दिली जाते.गावोगावच्या सुंदर आणि धनिकांच्या तरुणी सज्ज होतात ! त्या राजकुमाराच्या राजवाड्यावर एक नोकर असतो त्याच्या मुलीचे त्या राजकुमारावर प्रेम जडलेले असते. मनातून ती त्याला पूजत असते. स्वयंवराची दवंडी ऐकून ती गरीब मुलगी घरी आईला म्हणते, "मी पण जाणार त्यादिवशी दरबारात"आई समजावते कि, "तिथे खूप मोठ्या घरच्या मुली येणार, तुझी निवड कशी होईल ? तू दिसायलाही फार सुंदर नाहीस"मुलगी म्हणते, "ते मलाही माहित आहे, पण या निमित्ताने मला राजकुमारजवळ थोडा वेळ तरी जाता येईल. जवळून पाहता येईल. इतकेही मला पुरेसे आहे"ठरलेल्या दिवशी शंभरेक सुंदर तरुणी दरबारात हजर होतात. त्यात ही नोकराची मुलगी देखील साधेच कपडे घालून उभी असते. दरबार भरतो. राजकुमार येतो. राजकुमार प्रत्येक मुलीजवळ जातो आणि जवळच्या थैलीतील एक "बी" काढून देतो. सर्वाना बिया देऊन झाल्यावर, राजकुमार सांगतो, "हे बी तुम्ही घरी जाऊन कुंडीत लावा. त्याची देखभाल करून तीन महिन्यांनी पुन्हा इथे कुंडीसह या. जिच्या कुंडीतल्या झाडाचे फुल सर्वात जास्त सुंदर असेल, तिच्याशी मी लग्न करेन "सगळ्याजणी ते बी घेऊन घरी जातात. नोकराची मुलगीही घरी येते. एका कुंडीत ते बी पेरते. रोज काळजीने त्याला खत, पाणी वगैरे देते. पण दोन महिने झाले तरी त्यातून काहीच उगवत नाही. मुलगी हार मानत नाही. एका हुशार माळ्याकडे जाऊन काही टिप्स घेते. त्यानुसार पुन्हा प्रयत्न करते. पण कुंडीतून काहीच उगवत नाही. यातच तीन महिन्याची मुदत संपत येते. शेवटी ती निराश होते.तीन महिन्यांनी सर्व सुंदर तरुणी आपापल्या कुंड्या घेऊन दरबारात येतात. प्रत्येकीच्या कुंडीत सुंदर फुल असते. ती नोकरांची मुलगीही स्वतःची कुंडी घेऊन आलेली असते, ज्यात काहीच उगवलेले नसते. सगळ्याजणी तिला हसतात. इतक्यात राजकुमार हजर होतो. तो सर्व कुंड्याचे निरीक्षण करतो आणि शेवटी त्या नोकराच्या मुलीकडे निर्देश करून जाहीर करतो कि, "ती मुलगी मी निवडली आहे, "सगळा दरबार चकित होतो. काही सुंदर मुली चिडतात. त्यातली एक धिटाईने पुढे येऊन विचारते, "जिच्या कुंडीत काहीच उगवले नाही, तिची निवड का ? उलट माझ्या कुंडीत पहा, किती सुंदर गुलाब फुलला आहे. मग माझी निवड का नाही ?"राजकुमार हसून उत्तर देतो, "फक्त ती (नोकराची मुलगी) या पदासाठी योग्य आहे. कारण तिनेच एकटीने "इमानदारीचे" फुल फुलवले आहे. मी तुम्हा सगळ्यांना ज्या बिया दिल्या होत्या त्या निर्जीव होत्या. त्यातून फुल तर सोडाच पण काहीही उगवणार नव्हतेच."सगळ्या दरबारात टाळ्यांचा कडकडाट होतो ! आणि त्या नोकराच्या मुलीच्या डोळ्यात नकळत आनंदाश्रू पाझरू लागतात.महत्वाचे : इमानदारी हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किंमती आणि मौल्यवान आहे ! तो ज्याच्याकडे आहे, तो आयुष्यात यशस्वी नक्की होतो !! मग भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी !!म्हणून महत्वाची इमानदारी, सलाम करेल दुनियादारी !!सोन्यात जेव्हा 'हिरा' जडवला जातो तेव्हातो दागीना सोन्याचा नाही तर हि-याचा बोलला जातो,,तसचं देह हा सुध्दा माणसाचां सोनं आहे,आणि कर्म हा हिरा आहे,हि-यामुळे जसं सोन्याच मुल्य वाढतं,तसचं चांगल्या कर्मामुळेच देहाचं मुल्य हि वाढतं!!!
सामान्य ज्ञान
संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे ?
उत्तर: आळंदी
भारताचे थोर पितामह कोणाला म्हणतात ?
उत्तर: दादाभाई नवरोजी
महाराष्ट्राच्या विधिमंडळातील कोणते सभागृह शक्तिशाली आहे ?
उत्तर: विधानसभा
महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते ?
उत्तर: खोपोली (रायगड)
सर्वात मोठा दिवस कोणता ?
उत्तर: 21 जून
पसायदान
मौन
विसर्जन
0 Comments