Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Marathi Katha मराठी कथा Marathi Story मराठी गोष्टी | कथा लबाड कोल्हा

 लबाड कोल्हा

आपण सतत मराठी कथा Marathi Katha मराठी कथा Marathi Story मराठी गोष्टी  वाचनीय लेख शोधत असता. आज आपण मराठी पाठ्यपुस्तकातील अतिशय भावनिक कथा पाहणार आहोत. मुलावर संस्कार व्हावेत यासाठी वाचनीय कथागोष्टीवाचनीय लेख वाचन करणे आवश्यक असते. 

Marathi Katha मराठी कथा Marathi Story मराठी गोष्टी | कथा लबाड कोल्हा

 लबाड कोल्हा

एक कोंबडीचे पिल्लू होते. ते झाडाखाली दाणे टिपीत होते. इतक्यात थोडा वारा आला. झाडाची पाने हालली. एक पान खाली पडले. ते पडले नेमके पिल्लाच्या पाठीवर पिलाने वर पाहिले. त्याला वाटले, आभाळ पडले. ते घाबरून पळत सुटले. पळता पळता त्याला भेटला एक ससा. त्याने विचारले,

Marathi Katha मराठी कथा Marathi Story मराठी गोष्टी | कथा लबाड कोल्हा

"अरे, असा पळतोस का?"

पिल्लू म्हणाले, “पळा पळा! जीव वाचवा. आभाळ खाली पडत आहे. त्याचा एक तुकडा माझ्या पाठीवर पडला. ससा घाबरला. तोही त्याच्याबरोबर पळू लागला.

ते दोघे पळत होते. समोरून एक बदक येत होते. त्याने विचारले, “ सशा, सशा, काय झाले तुला ? पळतोस का असा ?" ससा काही थांबला नाही. तो म्हणाला, “बदकबुवा! पळा, पळा! थबकत थबकत चालू नका. वरून आभाळ पडत आहे.'

बदक बिचारे घाबरले. त्यांच्याबरोबर पळू लागले. वाटेत एक लांडोर नाचत होती. बदक म्हणाले, “ए नाचणबाई, पुरे कर नाचणे. आभाळ खाली पडत आहे. "

लांडोर पण घाबरली. तीही लागली पळायला. ते चौघेजण पळत होते. 'आभाळ पडले, आभाळ पडले,' असे सारखे ओरडत होते.

Marathi Katha मराठी कथा Marathi Story मराठी गोष्टी | कथा लबाड कोल्हा


समोरून आला एक कोल्हा. त्याने हे ऐकले. तो होता लबाड. मनात म्हणाला, 'बरी सापडली शिकार तो समोर गेला आणि त्यांना म्हणाला, घाबरू नका. चला सारे माझ्या घरात. माझे घर आहे जमिनीत आभाळ पडले तरी ते राहील वरच. " लांडोर, बदक, ससा व पिलू हे सर्व कोल्हयाच्या बिळात आले. कोल्हा म्हणाला, "आता राहा इथंच वर जाल तर आभाळ पडेल.

चौघांपैकी कोणीच कधी वर आले नाही!

ही कथा इंग्रजीत वाचा -

            There was a chicken. They were gathering seeds under the tree. Meanwhile, there was a little wind. Throw the leaves of the tree. A page fell. The chick looked up right on the chicks back as it fell. He thought, the sky fell. They ran away in fear. While running he met a rabbit. He asked,



"Hey, why do you run like that?"

Duck puppies said, “Run, run! Save life the sky is falling. A piece of it fell on my back. The rabbit was scared. He also started running with him.

They were both running. A duck was coming from the front. He asked, “Rabbit, rabbit, what happened to you? Why are you running?" The rabbit didn't stop. He said, "Duck! Run, run! Don't run around. The sky is falling from above.'

The poor duck was scared. Started running with them. A Landor was dancing on the way. The duck said, “O dancing queen, enough dancing. The sky is falling. "

Landor was also scared. She also started running. The four of them were running. They were shouting like 'The sky has fallen, the sky has fallen'.



A fox came from the front. He heard this. He was a liar. in mind he said, 'Well found prey, he went forward and said to them, don't be afraid. Let's all come to my house. My house is in the ground, even if the sky falls, it will remain above. Landor, Duck, Rabbit and Duck puppies all came to the fox's den. The fox said, "Stay here now, if you go up, the sky will fall.

None of the four ever came up!

 


Post a Comment

0 Comments