मराठी वाक्यप्रचार मराठी भाषेत वाक्यप्रचाराला खूप महत्त्वाचे स्थान आहे. भाषेचे सौदर्य खुलवण्याचे व वाढवण्याचे काम वाक्यप्रचार करत असतात. आपला म्हणणे अधिक प्रभावी व कमी शब्दात व्यक्त करावयाचे असल्यास वाक्यप्रचार मदत करतात. आपले संभाषम कौशल्ये अधिक प्रभावी करायचे असेल तर आपणास वाक्यप्रचार माहिती असणे खूप गरजेचे असते. लेखनातील सौदर्य वाढवण्यासाठी देखील वाक्यप्रचार महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आपण दररोजच्या बालण्यात सुद्धा असे बरेच वाक्यप्रचार वापरत असतो. अशा शब्दातून आपण गाभिर्य अधिक प्रभावी पणे व्यक्त करून सांगू शकतो.
वाक्यप्रचार म्हणजे काय?
वाक्यात वापरलेल्या शब्दाचा शब्दशाहा अर्थ न लावता त्या मतीत अर्थ लावला जातो, अशा शब्दांना आपण वाक्यप्रचार असे म्हणतो. किंवा शब्दसमूहांचा मराठी भाषेत वाक्यात वापर करताना त्यांच्या नेहमीच्या अर्थापेक्षा वेगळ्या व विशिष्ट अर्थाने भाषेत रूढ झालेल्या शब्द समूहास वाक्प्रचार अथवा भाषेतील संप्रदाय असे म्हणतात. शब्दसमूहांचा मराठी भाषेत वाक्यात वापर करताना त्यांच्या नेहमीच्या अर्थापेक्षा वेगळ्या व विशिष्ट अर्थाने भाषेत रूढ झालेल्या शब्द समूहास वाक्प्रचार असे म्हणतात.
वाक्यप्रचारांचा प्रभावी वापर-
वाक्यप्रचाराचा आपण वापर दररोजच्या संभाषणात करत असतो शिवाय बोलताना न कळत आपण असे विविध वाक्यप्रचार वापरत असतो. वाक्यप्रचाराचा वापर लेखनात देखिल केला जातो. निंबध लेखन, साहित्य लेखन, स्वाध्याय लेखन, सारांश लेखन, ललित लेखन अशा विविध ठिकाणी वाक्यप्रचार वापरले जातात. शिक्षणात, संभाषणात, भाषणात, चर्चा, वादविवाद, संवाद यामध्ये वाक्यप्रचार वापरले जातात.
मराठी भाषेतील वाक्प्रचार व त्याचे अर्थ
मराठी भाषेत वापरले जाणारे काही म्हत्त्वाचे वाक्यप्रचार व त्याचे अर्थ यावर विविध परीक्षेत विचारलेले प्रश्न व त्याची उत्तरे आपण सोडवणार आहेत खालील सर्व प्रश्न सोडवा. आपणास क्ती वाक्यप्रचार येतात हे तपासून पाहू शकता आशा करतो आपणास नक्की आवडेल.
मराठी भाषेतील वाक्प्रचार व त्याचे अर्थ सराव प्रश्न -
1/25
१. 'दाती तृण धरणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
१) खूप घाबरणे
२) गप्प बसणे
३) शरण येणे
४) साध्या सरळ गोष्टीसाठी गुंतागुतीचा प्रयत्न करणे.
Explanation: ३) शरण येणे
2/25
२. 'उष्ट्या हाताने कावळा न हाकणे. वाक्प्रचाराचा पुढीलपैकी अचूक अर्थ कोणता ते सांगा.
१) जेवत असतांना पक्ष्याला अन्न न खाणे
२) कावळ्याने उष्टावलेले न खाणे
३) कधीही कोणाला काहीही न देणे.
४) जेवताना कावळा पाहणे व त्याला उष्ट्या हाताने हाकलणे
Explanation: ३) कधीही कोणाला काहीही न देणे.
3/25
३. 'अत्तराचे दिवे जाळणे' म्हणजे काय?
१) श्रीमंतीचा बडेजाव करणे.
२) दिव्यात तेलाऐवजी अत्तर वापरणे
३) दिवाळी साजरी करणे
४) पैशाची उधळपट्टी करणे.
Explanation: ४) पैशाची उधळपट्टी करणे. √
4/25
४. 'कोंडमारा होणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
१) दोष देणे
२) निरुपाय होणे
३) फजिती होणे
४) यापैकी नाही
Explanation: २) निरुपाय होणे
5/25
५. बरोबर जोडी कोणती ?
१) अकलेचा खंदक - अत्यंत शहाणा माणूस
२) खुशाल चेंडू - अत्यंत चैनी माणूस
३) गाजरपारखी - प्रत्येक गोष्ट पारखून घेणारा
४) लंकेची पार्वती - अंगावर भरपूर दागिने असलेली स्त्री
Explanation: २) खुशाल चेंडू - अत्यंत चैनी माणूस
6/25
६. नैसर्गिक व शासकीय संकट या अर्थाचा वाक्प्रचार कोणता ?
१) अस्मानी-सुलतानी
२) आकाशाची कुन्हाड
३) दुष्काळात तेरावा महिना
४) दैवाचा कोप
Explanation: १) अस्मानी-सुलतानी
7/25
७. पुढील वाक्प्रचारांच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा. दात धरणे
१) वैर बाळगणे
२) दात पकडणे
३) गर्व करणे
४) अडथळा करणे
Explanation: १) वैर बाळगणे
8/25
८. जमीनदोस्त होणे म्हणजे---------
१) जमीनीचा मित्र
२) शेतकरी
३) संपूर्ण नाश होणे
४) जमीनीला भेटणे
Explanation: ३) संपूर्ण नाश होणे
9/25
९. रिक्त जागा भरा. दगडाला -------- येणे.
१) भुईमुगु
२) पाझर
३) तलाव
४) सागर
Explanation: २) पाझर
10/25
१०. 'अकलेचा कांदा' हा आलंकारिक शब्द कोणासाठी वापरतात ?
१) अतिशय विद्वान माणूस
२) अतिशय मुर्ख माणूस
३) अतिशय चैनी माणूस
४) अतिशय श्रीमंत माणूस
Explanation: २) अतिशय मुर्ख माणूस
11/25
११. खालीलपैकी चुकीचा अर्थ असलेले वाक्यप्रचार कोणताः
१) निगराणी करणे - काळजी घेणे
२) भ्रमनिरास होणे - वास्तवाची कल्पना येणे
३) मंत्रमुग्ध होणे - भारावून जाणे
४) डोळे लावून बसणे - डोळे मिटून बसणे
Explanation: ४) डोळे लावून बसणे - डोळे मिटून बसणे
12/25
१२. वाक्यप्रचाराचे अर्थाचे पर्याय ओळखा : विसंवाद असणे.
१) एकमेकांशी न जमणे
२) जवळीक निर्माण होणे
३) विचका होणे
४) गोंधळून जाणे
Explanation: १) एकमेकांशी न जमणे
13/25
१३. 'इतिश्री करणे' वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा ?
१) श्री गणेशा करणे
२) श्री लक्ष्मीस वंदन करणे
३) शेवट करणे
४) इतिहास सांगणे
Explanation: ३) शेवट करणे
14/25
१४. 'अटकेपार झेंडा लावणे' म्हणजे काय ?
१) मोठा पराक्रम गाजवणे
२) हार मानणे
३) पकडलेल्या आरोपीला कोर्टात हजर करणे
४) १५ ऑगस्टच्या दिवशी करण्यात येणारी क्रिया
Explanation: १) मोठा पराक्रम गाजवणे
15/25
१५. दगडावरची रेघ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.
१) खरे ठरणारे भविष्य
२) भविष्यातील भाकीत
३) खोटे ठरणारे भविष्य
४) यापैकी नाही
Explanation: १) खरे ठरणारे भविष्य
16/25
१६. बादरायण संबंध असणे-
१) घनिष्ठ मैत्री असणे
२) दुरान्वयाने संबंध असणे
३) ओढूनताणून संबंध लावणे
४) शत्रुत्व असणे
Explanation: ३) ओढूनताणून संबंध लावणे
17/25
१७. 'भरवशाच्या म्हशीला टोणगा' याचा अर्थ....
१) सगळेच मुसळ केरात
२) खात्रीच्या व्यक्तीकडून पूर्ण निराशा
३) केलेले सर्व प्रयत्न फुकट जाणे
४) स्वकीयांकडून घात होणे
Explanation: २) खात्रीच्या व्यक्तीकडून पूर्ण निराशा
18/25
१८. अनेकांना शास्त्रीय संगीतात (रस नसतो) - अधोरेखित वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
१) आवड नसणे
२) ज्ञात नसते
३) गती नसते
४) गळा नसणे
Explanation: १) आवड नसणे
19/25
१९. 'डोळ्यावर धुंदी चढणे' या वाकप्रचाराचा अर्थ निवडा.
१) नजरबंदी कररणे
२) अस्तित्वहीन होणे
३) गर्वाने माजणे
४) परतफेड करणे
Explanation: ३) गर्वाने माजणे
20/25
२०. 'चतुर्भूज होणे' म्हणजे ?
१) लग्न होणे
२) मतभेद होणे
३) भांडण होणे
४) गर्व होणे
Explanation: १) लग्न होणे
21/25
२१. 'मनात मांडे खाणे' या वाकप्रचाराचा अर्थ ?
१) मनोराज्य करणे
२) मन व्यक्त करणे
३) तारे तोडणे
४) यापैकी नाही
Explanation: १) मनोराज्य करणे
22/25
२२. कणिक तिंबणे, या वाक्यप्रचारातील अर्थ ओळखा.
१) कणीक भिजविणे
२) खूप मारणे
३) सूड उगवणे
४) अंदाज करणे
Explanation: २) खूप मारणे
23/25
२३. हात ओला करणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे?
१) हात धुऊन घेणे
२) हातपाय गाळणे
३) पैसे मिळणे
४) वरीलपैकी सर्व
Explanation: ३) पैसे मिळणे
24/25
२४. 'द्राविडी प्राणायाम करणे'. या वाक्यप्रचाराचा अर्थ ?
१) कधीही कोणाला काहीही न देणे
२) सोपा मार्ग सोडून कठिण मार्गाने जाणे
३) दुसऱ्यांना नेहमी व्देष करणे
४) यापैकी नाही
Explanation: २) सोपा मार्ग सोडून कठिण मार्गाने जाणे
25/25
२५. मात्रा चालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?
१) इलाज चालणे
२) त्रास होणे
३) उपयोग न होणे
४) फायदा होणे
Explanation: १) इलाज चालणे
Result:
@@@@@
समारोप- वाक्यप्रचार म्हणजे भाषेतील चपखल आणि परिणामकारक अभिव्यक्तीचे एक प्रभावी साधन आहे. वाक्यप्रचारांमुळे शब्दांमधील साधेपणा नष्ट होऊन त्यांना एक वेगळा गोडवा आणि सजीवता प्राप्त होते. मराठी भाषेतील वाक्यप्रचार हे तिच्या श्रीमंतीचे, संस्कृतीचे आणि परंपरेचे प्रतीक आहेत. वाक्यप्रचारांमुळे भाषेला सौंदर्य, गोडवा आणि आकर्षण प्राप्त होते. हे शब्दांना फक्त भाषेचा भाग न ठेवता त्याला एक जीवन देतात.वाक्यप्रचारांमुळे भावना, विचार आणि अनुभव अधिक प्रभावीपणे मांडता येतात. ते आपल्या संभाषणाला आणि लेखनाला प्रभावी बनवतात.वाक्यप्रचार भाषेतील प्रादेशिक वैशिष्ट्ये आणि लोकजीवनाच्या अनुभवांशी जोडलेले असतात. त्यातून स्थानिक परंपरा, चालीरीती, आणि संस्कृती यांचे दर्शन घडते.साहित्यिक लेखनात वाक्यप्रचार वापरल्याने ते जिवंत वाटते. लेखकांच्या कल्पकतेला आणि वाचकांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते.
0 Comments